Amit Shah in Raigad : सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचं आमंत्रण अन् खास पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज शनिवारी रायगड किल्ल्यावर दाखल झाले होते. या किल्ल्यावरील कार्यक्रम संपल्यानंतर ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगडमधील रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाह यांचा पाहुणचार करण्यात येणार आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी देखील सुनील तटकरे यांच्या रायगड येथील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला आहे. सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाह दाखल झाले आहेत. यानंतर ते तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतील. अमित शाह यांच्या भोजणासाठी खास मेन्यू देखील करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे पारंपारिक पदार्थ तयार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाहांचा पाहुणचार करताना त्यांच्यासाठी स्पेशल आमरस, उकडीचे मोदक, मिसळ पाव, साबुदाणा वडा असे पदार्थ देखील तयार करण्यात आले आहेत.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

