बौद्ध स्थळांना जोडणाऱ्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण, पंतप्रधान मोदी महापरिनिर्वाण मंदिरात पोहोचले

देशातील प्रमुख बौद्ध स्थळांना जोडणाऱ्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. विमानतळाचं लोकार्पण केल्यानंतर मोदी थेट महानिर्वाण मंदिरात पोहोचले. मोदी आज कुशीनगरमध्ये एका मेडिकल कॉलेजसह विविध विकास कामांचं भूमिपूजनही करणार आहे.

कुशीनगर: देशातील प्रमुख बौद्ध स्थळांना जोडणाऱ्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. विमानतळाचं लोकार्पण केल्यानंतर मोदी थेट महानिर्वाण मंदिरात पोहोचले. मोदी आज कुशीनगरमध्ये एका मेडिकल कॉलेजसह विविध विकास कामांचं भूमिपूजनही करणार आहे.कुशीनगर हे आंतरराष्ट्रीय बौद्ध स्थळ आहे. याच ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं. त्यामुळे कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या एअरपोर्टवर बौद्ध भिक्षूंसह कोलंबोहून पहिली फ्लाईट आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या विमानतळाचं लोकार्पण केलं. यावेळी श्रीलंकेचे मंत्री नमल राजपक्षे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह शेकडो बौद्ध भिक्षू उपस्थित होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI