बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्राचं एक पाऊल पुढे, कोलंबोवरून कुशीनगरला पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार; मोदी करणार उद्घाटन

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महानिर्वाणस्थळी म्हणजे कुशीनगर येथे कोलंबोहून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार आहे. (Kushinagar International Airport inaugural flight land airport)

बुद्धिस्ट सर्किटसाठी केंद्राचं एक पाऊल पुढे, कोलंबोवरून कुशीनगरला पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार; मोदी करणार उद्घाटन
Kushinagar International Airport
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 12:03 PM

नवी दिल्ली: जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महानिर्वाणस्थळी म्हणजे कुशीनगर येथे कोलंबोहून पहिलं आंतरराष्ट्रीय विमान लँडिंग होणार आहे. 125 मान्यवर आणि बौद्ध भिक्षूंसह हे विमान 20 ऑक्टोबर रोजी कोलंबोवरून कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. बौद्ध स्थळांना जोडण्यासाठी हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

या उद्घाटन समारंभाला उत्तर प्रदेशच्या राज्यापाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्या शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या आठवड्यापासूनच हे विमानतळ सुरू होणार आहे. या विमानतळामुळे अनेकांना भारतातील महत्त्वाच्या बौद्धस्थळांना भेटी देता येणार आहे. तसेच श्रीलंकेसह अनेक देशातील बुद्धानुयायांना भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेल्या कुशीनगरात येणं सोपं जाणार आहे.

300 प्रवाशांची क्षमता

एअर पोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाने राज्य सरकारच्या सहकार्याने 260 कोटी रुपये खर्च करून हे एअरपोर्ट बांधलं आहे. 3600 वर्गमीटरवर हे टर्मिनल भवन बांधण्यात आलं आहे. तसेच एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाने कुशीनगर एअरपोर्टचा विकासही केला आहे. एअर पोर्ट अॅथोरिटीनुसार नवीन टर्मिनल व्यस्ततेच्या काळातही 300 प्रवाशांना सांभाळू शकणार आहे. कुशीनगर हे एक आंतरराष्ट्रीय बौद्धस्थळ आहे. या ठिकाणीच भगवान गौतम बुद्धाचं महानिर्वाण झालं होतं. बुद्धिस्ट सर्किटचा हा एक केंद्रबिंदू आहे. लुंबिनी, सारनाथ आणि गया आदी तिर्थक्षेत्रांचाही या बुद्धिस्ट सर्किटमध्ये समावेश आहे.

बौद्ध थीमवरील सर्किटचा विकास करणार

डायरेक्ट एअर कनेक्टिव्हीटमुळे देश आणि विदेशातील बौद्ध धर्मीयांना कुशीनगरला जाण्यास मदत होणार आहे. या विमानतळामुळे लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, राजगीर, संकिसा आणि वैशालीचा विकास होण्यास मदत होणार आहे. कुशीनगर एअरपोर्टमुळे दक्षिण आशियासोबत डायरेक्ट एअर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. तसेच बुद्धिस्ट थीमवर आधारीत सर्किटमुळे विकासही होणार आहे. श्रीलंका, जपान, तैवान, दक्षिण कोरिया, चीन, थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर आदी ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना कुशीनगरसह इतर बौद्धस्थळांवर येणं या एअरपोर्टमुळे अधिक सोयीस्कर होणार आहे.

सांस्कृतिक देवाणघेवाण वाढणार

कुशीनगर एअरपोर्ट सुरू झाल्याने बौद्ध सर्किटमुळे सांस्कृतिक देवाणघेवाणही सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचीही वर्दळ वाढेल. तसेच रोजगाराचे मार्गही खुले होतील. या विमानतळाच्या उद्घाटनानंतर कुशीनगर हे बौद्धस्थळ म्हणून नावारुपाला येणार आहे. जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी हे एक महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे. कुशीनगर विमानतळामुळे बिहारमधील बौद्ध स्थळांचाही विकास होण्यास मदत होणार आहे.

बौद्ध सर्किटमध्ये चार बौद्धस्थळांचं अन्यन साधारण महत्त्व आहे. बिहारचा वैशाली जिल्हा बौद्धांचं एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. भगवान बुद्धांनी त्यांचं शेवटचं प्रवचन या ठिकाणी दिलं होतं. तसेच दुसरी धम्मसंगितीही वैशालीलाच झाली होती. त्यानंतर राजगीरचं नाव येतं. राजगीर हे नालंदापासून अवघ्या 19 किलोमीटरवर आहे. नालंदा हे बौद्धांचं शिक्षणाचं केंद्र होतं. या सर्वांना मिळून बौद्ध सर्किटची संकल्पना आली आहे. त्याला अंतिम रुप देण्याचं काम मोदींनी केलं आहे. या बौद्ध सर्किटच्यामुळे या भागातील अर्थव्यवस्थेतही मोठा फरक पडणार आहे.

संबंधित बातम्या:

Video: भाजपच्या मंत्र्यांनी महिला उमेदवाराच्या केसांत हात घातला, काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर, पण खरं काहीतरी वेगळंच!

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजारांवर, सक्रिय रुग्णसंख्याही 227 दिवसातील नीचांकी

Kerala Flood: डोळ्यासमोर अख्खं घर वाहून गेलं, देवभूमी केरळात वरुणराजाचा रुद्रावतार, भूस्खलनात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू

(Kushinagar International Airport inaugural flight land airport from Colombo carrying 125 dignitaries Buddhist Monks)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.