Jayant Patil | पिचड समर्थकाची राष्ट्रवादीत घरवापसी, जयंत पाटील म्हणतात…

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार, असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता (Sitaram Gaikar NCP Jayant Patil )

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर (Sitraam Gaikar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही, असे शालजोडीत लगावून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गायकरांचे स्वागत केले. गायकर हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकचे माजी चेअरमन आहेत.