अजित पवारांनी धोतर फेडण्याची भाषा केलेल्या ‘त्या’ नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी

2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता. | NCP sitaram gaikar

अजित पवारांनी धोतर फेडण्याची भाषा केलेल्या 'त्या' नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी
2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 7:39 AM

अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सुरु असलेल्या महाभरती मोहीमेत भाजपचा आणखी एक नेता गळाला लागला आहे. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर (Sitraam Gaikar) हे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मुधकर पिचड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Madhukar Pichad Supporter Sitaram Gaikar will Join Ncp)

2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता. त्यावेळी अजित पवार यांनी प्रतिस्पर्धी असलेल्या सीताराम गायकर यांची धोतर फेडण्याची भाषा केली होती. त्यानंतर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. किरण लहामटे यांनी गायकर यांचा पराभवही केला होता.

या सगळ्यानंतर राज्यात महाविकासआघाडीची सत्ता येऊन आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पाठिंब्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सीताराम गायकर हे बिनविरोध निवडून आले होते. तेव्हापासूनच सीताराम गायकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करणार, अशी चर्चा रंगली होती. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. सीताराम गायकर यांच्यासह अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे 9 सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

सीताराम गायकर यांच्या मदतीने अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत मधुकर पिचड यांना धक्का देण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे. लवकरच या कारखान्याची निवडणूक होणार आहे.

कोण आहेत सिताराम गायकर?

* उस तोड कामगार * मेगरस येथे दूध संकलन केंद्राची सुरूवात * अमृत सागर दुध संघाचे संचालक * 1995 मधुकर पिचडा विरोधात बंड करत तिसऱ्या आघाडी स्थापन केली. मात्र, तिसरी आघाडी सपशेल फोल ठरली. * अशोक भांगरेचा मधुकर पिचडांनी 35 हजाराच्या फरकाने त्यावेळी पराभव केला * निवडणुकानंतर काही दिवस पुन्हा पिचडांसोबत आले. अगस्ती ग्रामिण दुध संघाचे संचालक झाले. नंतर दुध संघाच्या चेअरमनपदी वर्णी लागली. * 1988 साली अगस्ती सागर कारखान्याची स्थापना झाली. त्यात ‌सीताराम गायकर संचालक झाले. * अकोले तालुका एज्यकेशन विश्वस्त संचालक * अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष * मधुकर पिचड यांच्या आशीर्वादाने जिल्हा बँकेचे अध्यक्षपद. अध्यक्षपदाची कारकीर्द वादग्रस्त राहिली. कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप.

संबंधित बातम्या   

पिचडांनी पाप केलंय, गाठ माझ्याशी आहे, सीताराम गायकरांचं धोतर फेडू : अजित पवार

…तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार 

मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!  

(Madhukar Pichad Supporter Sitaram Gaikar will Join Ncp)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.