VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 9 March 2022
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या कटाविरोधातील सरकारी वकिलाच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. फडणवीस विधानसभेत केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी याबाबतचे पुरावेच विधानसभा अध्यक्षांकडे दिले. फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन त्यात व्हिडीओ पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या कटाविरोधातील सरकारी वकिलाच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. फडणवीस विधानसभेत केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी याबाबतचे पुरावेच विधानसभा अध्यक्षांकडे दिले. फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन त्यात व्हिडीओ पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं. महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकील षडयंत्रं रचत होता. संबंधित व्यक्तींशी संवाद साधत होता. त्यावेळी मोठे साहेब म्हणून एका मोठ्या नेत्याचं नावही घेत होता. हे मोठे साहेब कोण? हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं. या व्हिडीओमध्ये मोठे साहेब म्हणून माझा उल्लेख केला आहे. पण या प्रकरणाशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

