VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 21 April 2022

धनंजय मुंडे यांना बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना धमकावणाऱ्या रेणू शर्मा हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रेणू शर्मा या महिलेवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस ठाण्यात इंदौरच्या महिले विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Apr 21, 2022 | 4:20 PM

धनंजय मुंडे यांना बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना धमकावणाऱ्या रेणू शर्मा हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रेणू शर्मा या महिलेवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस ठाण्यात इंदौरच्या महिले विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबधित गुन्हा पुढील तपासासाठी क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आरोपी महिलेने मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. नंतर महिलेने मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय नंबरहून महिलेने फोन करत 5 कोटी रुपये किंमतीचे दुकान आणि महागड्या मोबाइलसाठी तगादा लावलेला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें