video : महाफास्ट न्यूज 100 मध्ये पाहा राज्यातील महत्वाच्या ठळक घडामोडी
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या कामाच्या भीतिमुळेच भाजपवाले त्यांच्यावर टीका करतात असेही तटकरे म्हणाले.
मुंबई : राज्यातील नेत्यांच्या वदग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या निशाना साधला आहे. तसेच त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या मालिकेसाठीच त्यांनी स्वराज्यरक्षक हा शब्द वापरला अशी टीका राणे यांनी केली आहे.
तर राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या कामाच्या भीतिमुळेच भाजपवाले त्यांच्यावर टीका करतात असेही तटकरे म्हणाले.
तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला टार्गेट करत हे सरकार व्हेंटिलेटरवर आहे. ते पुढचा फेब्रुवारी महिना देखिल पाहणार नाही असा घणाघात राऊत यांनी केला आहे. यासह इतर घडामोडीसाठी पहा महाफास्ट न्यूज 100…
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब

