MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 30 November 2021

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आपण त्यावर मात केली. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, सध्या तरी राज्यात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र मागचा अनुभव पाहाता आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवे नियम जारी केले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आपण त्यावर मात केली. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, सध्या तरी राज्यात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र मागचा अनुभव पाहाता आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवे नियम जारी केले आहेत. परदेशातून आलेला एकही प्रवाशी मुंबई विमानतळावरून आरटीपीसीआर झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही. त्यासाठी 50 तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच ज्या देशात ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक आहे, अशा देशातून भारतामध्ये परतणाऱ्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच मुंबईकरांनो घाबरू नका, फक्त काळजी घ्या असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Published On - 10:55 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI