MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 October 2021

अब्दुल सत्तार आज निवडणूक प्रचारासाठी देगलूर येथे आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखी आहे. त्यांचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाहीत. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मुडदा पाडतील, असं सत्तार म्हणाले.

उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे. उद्धवजींचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाही, असं सांगतानाच देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना ठणकावले.

अब्दुल सत्तार आज निवडणूक प्रचारासाठी देगलूर येथे आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखी आहे. त्यांचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाहीत. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मुडदा पाडतील, असं सत्तार म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI