MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 30 November 2021

आता नवीन कोरोना व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णय पुढे ढकलल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा काही जिल्ह्यातील शाळा 1 डिसेंबर ऐवजी 10 किंवा 15 डिसेंबरला सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  काहीसा कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात होता. मात्र, आता नवीन कोरोना व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूचा धोका निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णय पुढे ढकलल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा काही जिल्ह्यातील शाळा 1 डिसेंबर ऐवजी 10 किंवा 15 डिसेंबरला सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे.

Published On - 7:35 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI