Mahaparinirvan Din 2024 : मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

Mahaparinirvan Din 2024 : मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

| Updated on: Dec 06, 2024 | 10:46 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काल पासून अनुयायी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आज लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अस्थीकलश आणि प्रतिमेस अभिवादन करून बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेणार आहेत. अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आपला देश वेगाने प्रगती करतोय. आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर भारत आहे. याच सर्व श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं, त्याचं आहे. कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन तयार करण्यात आलं असल्याचेही फडणवीस म्हणाले.

Published on: Dec 06, 2024 10:46 AM