Mahaparinirvan Din 2024 : बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर अभिवादनासाठी भीमसागर उसळला

Mahaparinirvan Din 2024 : बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर अभिवादनासाठी भीमसागर उसळला

| Updated on: Dec 06, 2024 | 11:04 AM

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईत दाखल

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. हाच दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई महापालिकेने विविध सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक ठिकाणी अनुयायींची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, सर्व अनुयायांना शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Published on: Dec 06, 2024 11:04 AM