AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराजांनी सिंधुदुर्गला स्वातंत्र्य मिळवून दिलं, हा आमच्या मराठ्यांचा गौरव - jyotiraditya scindia

महाराजांनी सिंधुदुर्गला स्वातंत्र्य मिळवून दिलं, हा आमच्या मराठ्यांचा गौरव – jyotiraditya scindia

| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 3:43 PM
Share

बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं माझ्या वडिलांचं विमानतळाचं एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकणात रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद आणि अभिनंदन करतो, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझं एक पारंपरिक आणि रक्ताचं संबंध आहे. माझं सिंधुदुर्गासोबतही संबंध आहे. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचा प्रतिक आहे. मी 500 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. पण छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते. शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आमच्या मराठ्यांचा गौरव क्षण आहे. आमची सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. हे तीन दशकांचं संकट होतं. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं माझ्या वडिलांचं विमानतळाचं एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकणात रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद आणि अभिनंदन करतो, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.