Manikrao Kokate : कृषीमंत्र्यांना घरी बसवून प्रश्न मिटणार आहे का? वादग्रस्त विधानानंतर, कोकाटेंचा विरोधकांना प्रश्न
Manikrao Kokate Controvercial Statement : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आज टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
मी बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मला फक्त एवढंच वाटतं की राज्यात शेती अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे, हाच आमचा हेतु आहे, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हंटलं आहे. मंत्री कोकाटे यांच्याकडून सातत्याने शेती आणि शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले जात आहेत. नुकत्याच नाशिकच्या दौऱ्यावर असताना देखील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना कोकाटे यांनी असंच एक वादग्रस्त विधान केलेलं होतं. अधिकारी उभ्या पिकाचे पंचनामे करत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने कोकाटे यांच्याकडे केली होती. त्यावर कोकाटे यांनी कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? असं विधान केलं होतं. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केलेली आहे. आज याच पार्श्वभूमीवर टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना कोकाटे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा

