Aurangabad | बैलाची शेतकऱ्याला जोरदार धडक, पोळ्याच्या दिवशी घटना

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा सण बळीराजाकडून साजरा केला जातो. मात्र याच दिवशी बैलाने शेतकऱ्याला ढुशी मारल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वडजी गावात बैलाने शेतकऱ्याला जोराची धडक दिली.

औरंगाबाद : बैलाने शेतकऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. औरंगाबादमध्ये हा प्रकार घडला. विशेष म्हणजे ऐन बैलपोळ्याच्या दिवशीच ही घटना घडली. बैल आणि शेतकरी यांचं अनोखं नातं आपण नेहमीच पाहतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा सण बळीराजाकडून साजरा केला जातो. मात्र याच दिवशी बैलाने शेतकऱ्याला ढुशी मारल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वडजी गावात बैलाने शेतकऱ्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पोळ्याच्या दिवशी सण साजरा करत असतानाच अचानक बैलाने धडक दिली होती. बैलाने धडक दिल्याचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी शेतकऱ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI