VIDEO : जो प्राणवायू प्राण वाचवण्यासाठी, त्याच प्राणवायूच्या लिकेजने जीव जातोय, सुधीर मुनगंटीवार हळहळले

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीच्या दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर भाजप नेते सुधील मुनगंटीवार हळहळले (Sudhir Mungantiwar on Oxygen tanker leaked at DR zakir Husaain hospital)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:36 PM, 21 Apr 2021

नाशिक : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीच्या दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर भाजप नेते सुधील मुनगंटीवार हळहळले आहेत. “अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणेचे चिंधड्या उडवले आहेत. जो प्राणवायू प्राण वाचवण्यासाठी आहे त्याच प्राणवायूच्या लिकेज होण्याने लोकांचा जीव जातोय. हे आमच्यासाठी चिंताजनक आहे. हे 21 वं शतक विज्ञान युगाचं आपण शतक म्हणतो. या विज्ञान युगाच्या शतकात अशा घटना कुणीही मान्य करु शकणार नाही. या घटनेबाबत चौकशी करुन, अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याबाबतच्या सर्व ठिकाणी सूचना करण्याची जास्त आवश्यकता आहे”, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी संवेदना व्यक्त केल्या (Sudhir Mungantiwar on Oxygen tanker leaked at DR zakir Husaain hospital).