AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS Internal Dissent: केसानं गळा कापला, मनसेचे मनीष धुरीही नाराज? थेट राज ठाकरेंकडे तक्रार, लवकरच मोठा...

MNS Internal Dissent: केसानं गळा कापला, मनसेचे मनीष धुरीही नाराज? थेट राज ठाकरेंकडे तक्रार, लवकरच मोठा…

| Updated on: Jan 07, 2026 | 3:20 PM
Share

पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेमध्ये नाराजी वाढल्याचे चित्र आहे. राज ठाकरे शाखा भेटींवर असतानाच अंधेरीतील पदाधिकारी मनीष धुरी यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली आहे. संतोष धुरींसारखे काही नेते पक्ष सोडून गेले असताना, मनीष धुरींची नाराजी मनसेसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

राज ठाकरे यांच्याकडून विक्रोळीमध्ये आज शाखांना भेटी दिल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटींनंतर राज ठाकरे यांनी देखील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रचाराला वेग येत असतानाच मनसेमध्ये अंतर्गत नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. संतोष धुरी यांच्या पाठोपाठ आता मनसेचे अंधेरीतील पदाधिकारी मनीष धुरी हे देखील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल परब, संजय कदम आणि दीपक सणस यांनी आपल्याला केसाने गळा कापला अशी प्रतिक्रिया मनीष धुरी यांनी दिली आहे. मनीष धुरी यांनी राज ठाकरेंना एक पत्र पाठवून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली आहे. वॉर्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते प्रचारात सहभाग घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मनीष धुरी यांचे बंधू कुशल धुरी हे मनसेचे अधिकृत उमेदवार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर दीपक सणस हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्थानिक शिवसैनिक दीपक सणस यांचा प्रचार करत असल्याची मनीष धुरी यांची तक्रार आहे. यापूर्वी संतोष धुरी भाजपामध्ये तर हेमंत कांबळे आणि राजा चौगुले शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. मनीष धुरी हे देखील मनसे सोडणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Published on: Jan 07, 2026 03:20 PM