उदय सामंत शिंदे गटात सामील होण्याची शक्यता, सकाळपासून नॉट रिचेबल
एकनाथ शिंदे यांच्या बंडात राज्यातील आणखी एक मंत्री सहभागी झाल्याची शक्यत आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात राज्यातील आणखी एक मंत्री सहभागी झाल्याची शक्यत आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. शनिवारच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर त्यांचाशी संपर्क झालेला नाही. शिंदे गटात सध्या 37 हून अधिक शिवसेना आमदार आणि 9 हून जास्त अपक्ष आमदार असल्याचं कळतंय. त्यात उदय सामंतही सहभागी झाल्यास शिंदे गटाचं बळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे विमानाने गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती आहे. हा शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
Published on: Jun 26, 2022 04:24 PM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

