औषध निरीक्षक परीक्षा रद्द: पेपरफुटीमागे कोण?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा पेपरफुटीच्या आरोपामुळे रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी आता अभिमन्यू पवार आक्रमक झाले असून त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. “प्रश्नपत्रिका फुटलीच कशी?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. एकाच उमेदवाराला पेपर मिळाल्याच्या आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा पेपरफुटीच्या आरोपामुळे रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी आता अभिमन्यू पवार आक्रमक झाले असून त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. “प्रश्नपत्रिका फुटलीच कशी?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
एकाच उमेदवाराला पेपर मिळाल्याच्या आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पेपरफुटीमागे आयोगातील कोणती यंत्रणा आहे, याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभिमन्यू पवारांनी केली आहे.
Published on: Aug 26, 2026 01:55 PM
Follow Us
Latest Videos

