AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | राज्यपाल महाराष्ट्रातून जाणार की गंमतच?

Special Report | राज्यपाल महाराष्ट्रातून जाणार की गंमतच?

| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 12:03 AM
Share

केंद्रीय पातळीवर या साऱ्या घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल भाष्य केलं. त्यांमनी अतिवृष्टीचा आधार घेत जयंत पाटील यांना वाटत असेल तर मी लवकरात लवकर इथून निघून जाईल, असं वक्तव्य केलं.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari )यांनी मिश्किल भाष्य करत उत्तराखंडमध्ये परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उद्देशून यासंबंधी भाष्य केलं. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ते सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari would be Active again uttarakhand politics)

भगतसिंह कोश्यारी यांचे मिश्किल भाष्य

बेबी राणी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल 10 सप्टेंबर रोजी बदलले. यामध्ये उत्तराखंडचा कार्यभार सेवानिवृत्त ले. जनरल. गुरमित सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला. केंद्रीय पातळीवर या साऱ्या घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल भाष्य केलं. त्यांमनी अतिवृष्टीचा आधार घेत जयंत पाटील यांना वाटत असेल तर मी लवकरात लवकर इथून निघून जाईल, असं वक्तव्य केलं.

भगतसिंह कोश्यारी नेमंक काय म्हणाले?

“नेहमी अतिवृष्टी पूर अशी संकटं असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती नेहमी असायची. पण मी राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात आल्यापासून येथेही पाऊस सुरू झालाय. अतिवृष्टी होत आहे. जर हे जंयत पाटील यांना वटत असेल तर मी लवकरात लवकर हे सोडून निघून जाईल. असंच तर नुकसान झालं नसेल ना जंयत साहेब ?” असे कोश्यारी म्हणाले.