Nanded Cloudburst : सगळं पाण्यात… लेकरं बाळं उपाशी, ढगफुटीमुळं संसार उघड्यावर, महिलांना अश्रू अनावर अन्…
नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी नंतरची विदारक परिस्थिती समोर आली. शेतकरी शेत मजुरांची घर पूर्णपणे उद्धवस्त झालेत. त्यामुळे गावकऱ्यांना आश्रू अनावर झाले. गेल्या दोन दिवसापासून या गावात सैन्य दाखल झालाय. मदतकार्य अजूनही सुरूच आहे.
नांदेडच्या हसनाळा गावात झालेल्या ढगफुटीमुळे घरंच्या घरं उद्धवस्त झाली. नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटीमुळे एवढा पाऊस झाला की शेतकरी आणि कामगारांची घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली. घरात खाण्यापिण्याच्या वस्तू ही शिल्लक राहिलेल्या नाहीत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला यामुळे मुखेड तालुक्यातील पाच ते सहा गाव काल पाण्याखाली होते आणि आज पाऊस ओसरल्यानंतर विदारक चित्र समोर आलंय. झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात सगळीकडेच चिखल झालाय. हसनाळा गावात पावसाचा जोर कमी झालाय. आता सैन्याकडून पडक्या घरांमधून साहित्य बाहेर काढलं जातंय. सैन्याच्या वतीने मेडिकल कॅम्पही उभारण्यात आला. गावकऱ्यांना प्राथमिक उपचार देण्यास सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचही नुकसान झालं. १२ ते १४ लाख एकरावरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे पंचनामाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

