Shivraj Rakshe Video : ‘गरिबांच्या मुलांवर अन्याय मात्र पंचांना शिक्षा काय?’, शिवराज राक्षेच्या आईचा संतप्त सवाल
यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाच गालबोट लागलं आहे. पंचाला लाथ मारणं आणि त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन मल्लांवर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मॅटवरील कुस्ती प्रकारात पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षेमध्ये अंतिम सामना रंगला. अंतिम लढतीमध्ये महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्याने पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले आहे. मोहोळ आणि राक्षेने दंड पकडून आणि बुक ठोकून कुस्तीला सुरुवात केली आणि अवघ्या 40 सेकंदात पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला मॅटवर आपटलं. पंचांनी पृथ्वीराज मोहोळच्या बाजूने निर्णय दिला आणि तिथेच मोठ्या गोंधळाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेंच्या आई सुरेखा राक्षेने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “शिवराज आणि महेंद्र गायकवाड या दोन मल्लांवर कारवाई केली, तर चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर काय कारवाई करणार?” असा संतप्त सवाल केला आहे. तर “यांना शिक्षा दिली, तशी पंचांना पण शिक्षा द्या ना मग. पंचांना नको का शिक्षा व्हायला? 9-10 वर्षापासून पोरावर अन्याय होतोय. जिल्ह्याच्या कुसत्यांमध्ये वेगळा निर्णय दिला जातो. पोराच म्हणणं होतं, रिप्लाय दाखवा. आदल्यादिवशी मॅटवर खेळायला गेला, तेव्हा पण पंचाने शिवीगाळ केली” असं आरोपही शिवराज राक्षेच्या आईने केला. बघा काय म्हणाल्या सुरेखा राक्षे?

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले

संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस

वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख

आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
