मंत्रालयात लाचेसाठी सिक्रेट कोड? 1 रेष म्हणजे 1 लाख?
मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर मेडिकल चालकांकडून सिक्रेट कोड वापरून लाच मागितल्याचा आरोप आहे. एका रेषेसाठी ५० हजार, दोन रेषांसाठी एक लाख रुपये मागितल्याचे समोर आले असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेडिकल दुकानदारांकडून लाच घेण्यासाठी एक सिक्रेट कोड वापरला जात होता, असा आरोप आहे. झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर हे गंभीर आरोप झाले आहेत.
मेडिकल चालकांकडून पैशांची मागणी करताना, कागदपत्रांवर एक रेष मारल्यास ५० हजार रुपये, दोन रेषा मारल्यास एक लाख रुपये आणि तीन रेषांसाठी दीड लाख रुपये घेतले जात असत. या कोडवर्डद्वारे लाच मागितल्याचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली असून, दोषींवर कारवाई करण्याचे आणि सत्य बाहेर आणण्याचे आश्वासन दिले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मात्र त्यांना या प्रकरणाची कल्पना नसल्याचे सांगितले आहे.
Published on: Feb 20, 2026 09:50 AM
रस्त्यावर चालत होता, अचानक बेस्ट बसने मागून धडक दिली अन् पुढे जे घडलं
सर्वत्र धुकं पसरलं अन् विचित्र असा वास... एमआयडीसीत भीषण कार्बन गॅस
नदीचं पाणी ओसरलं अन् मगर थेट रस्त्यावर आली; व्हिडीओ होतोय व्हायरल
राजकीय गणित बदलणार? शरद पवारांचा गट सत्तेसोबत जाण्याच्या चर्चेदरम्यानच
