Mumbai Weather Update : गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट
अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे आणि यावेळी गणेश भक्तांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. कारण काल रात्रीपासून मुबंई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज पहाटेपासून या पावसाने उसंत घेतली आहे.
गणेशोत्सवाच्या आधीच मुंबई आणि कोकणात पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. काल रात्री मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं त्यामुळे नागरिकांची गैरसोय देखील झाली होती. मात्र मुंबईत आज पाऊस थांबल्याने सखल भागात झालेल्या पावसाचा निचरा झाला आहे. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव असल्याने नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत तर काही ठिकाणी गणपती सणाच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज मुंबईत पावसाची रिमझिम पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांची गणेशोत्सवाच्या तोंडावर धावपळ होणार आहे. मुंबईत गेले दोन आठवडे पावसाने हजेरी घेतली होती. मात्र कालपासून पुन्हा पावसाचं कमबॅक पाहायला मिळालं. बघा मुंबईतील पावसाचे अपडेट काय?
Latest Videos
Latest News