Maharashtra Elections 2025 : …म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या, निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून नेमकं काय स्पष्टीकरण?
निवडणूक स्थगितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. केवळ अनगरच नव्हे तर, राज्य निवडणूक आयोगाने कायदेशीर सल्ला घेऊन 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बारामती, महाबळेश्वर, पुणे आणि सातारा येथील नगरपालिकांसह २३ ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने २४ नगरपालिका आणि १५० सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाच्या सूत्रांनुसार, सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊन निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १७ एक ब च्या तरतुदीनुसार, उमेदवारांना कोर्टात अपील करण्यासाठी ठराविक वेळ देणे आवश्यक होते, अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता. त्यामुळे विशिष्ट निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, भाजपने निवडणूक आयोगाला पत्रदेखील दिले आहे. पुढे ढकललेल्या निवडणुकांच्या खर्चाबाबत संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

