काश्मिरी पंडितांना न्याय महाराष्ट्रानं दिला
भारत देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण दिले आहे. आणि हे आरक्षण दिले आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी.
भारत देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या राज्याने काश्मिरी पंडितांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण दिले आहे. आणि हे आरक्षण दिले आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी कायमच काश्मिरी पंडितांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्नशील राहिले आहे. त्यामुळे कुणीही उठावे आणि काश्मिरी पंडितांविषयी ज्ञान पाजळावे असे करु नका. भाजप गेल्या सात वर्षापासून सत्तेत आहे, केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय केले असा सवालही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. त्यामुळे सिनेमा बघून कुणी पेटून उठा म्हणून आवाहन करत असेल तर ते चुकीचे आहे असेही मत अरविंद सावंत यांनी मांडले.
Published on: Mar 19, 2022 07:43 PM
Follow Us
Latest Videos
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?

