Satyacha Morcha : दुबार मतदार याद्यांची अंत्ययात्रा, निवडणूक आयोगाविरोधात मनसे-मविआ आक्रमक
मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार निदर्शने केली. त्यांनी बोगस मतदार याद्या आणि ईव्हीएमची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत आपला निषेध व्यक्त केला.
मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार याद्या आणि ईव्हीएम मशीनची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून आपला निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी डुप्लिकेट ईव्हीएम मशीन आणि मतदार याद्या तिरडीवर ठेवून घोषणाबाजी केली.
बोगस मतदानाच्या जोरावर निवडणुका जिंकणे आणि लोकांची फसवणूक करणे हे लोकशाही आणि संविधानाचा अपमान असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले. करोडो मतदार मतदानासाठी येतात, परंतु त्यांचे मत दुसऱ्याला जाते, हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचा आरोप केला.
Published on: Nov 01, 2025 05:33 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

