महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडवर…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15 हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या असून आता महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. राज्यात राज्य राखीव दलाच्या सात तुकड्या तर 30 हजार होमगार्ड तैनात केले गेले आहेत. तर महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या असून सुरक्षेसाठी आणि मनसेवर कारवाईसाठी राज्यातील पोलीस सज्ज झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर 116, […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15 हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या असून आता महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. राज्यात राज्य राखीव दलाच्या सात तुकड्या तर 30 हजार होमगार्ड तैनात केले गेले आहेत. तर महाराष्ट्र पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या असून सुरक्षेसाठी आणि मनसेवर कारवाईसाठी राज्यातील पोलीस सज्ज झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर 116, 117, 135 आणि 151 A या कलमांतर्गत त्यांच्या गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे वर्तवले जात आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आले असून मनसेच्या कार्यकर्त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या असून महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे.

