Mumbai Rain : सायन किंग्ज सर्कलमध्ये पावसाचा कहर, रस्त्याला नदीचं रूप; गुडघाभर पाणी अन् वाहनं लागली तरंगू…
दादर हिंदमता परिसर, सायन किंग्ज सर्कल या भागात मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लक्ष दिले जात आहे. बघा व्हिडीओ
मुंबईतील दादरच्या हिंदमाता परिसराप्रमाणे सायनच्या किंग्ज सर्कल भागातही मोठं पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस होत असल्याने किंग्ज सर्कल परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येतं आहे. याच साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागत आहे. तर पायी चालणाऱ्या नागरिकांना रस्ता शोधताना मोठी कसरत होत आहे. सकाळी याच साचलेल्या पाण्यात काही वाहनं मोठ्या गाड्या बंद पडल्या होत्या. तर किंग्ज सर्कल भागातील काही रस्ते वाहतुकीसाठी धोकायदायक असल्याने बंद करण्यात आले आहेत. साचलेल्या पाण्यातून कोणती दुर्घटना होऊ नये, यासाठी महानगर पालिकेचे कर्मचारी आणि मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

