Maharashtra Rain : मराठवाडा-विदर्भात मुसळधार पावसाचा रूद्रावतार, कोणत्या भागाला झोडपलं?
मुसळधार पावसात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू देखील करण्यात आलं. यवतमाळच्या पुसदमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. पुसदमध्ये कित्येक घरात पुराचं पाणी शिरलं. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या ठिकाणी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने वडसद या नाल्याला पूर आला. पुराच्या पाण्याने नाल्याला रौद्र रूप धारण झाले होते.
विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला. नांदेड बीडसह परभणीच्या अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. तर यवतमाळ येथेही पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं यामुळे अनेक घरात पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर काही ठिकाणी माणसं कंबरे एवढ्या पाण्यात बुडाले तर वाहनंही अर्धी पाण्यात गेली होती. या पुरात या भागातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. यावेळी नाल्या लगतच्या एका घरात पाणी शिरले. या घरातील 3 लोक या पुरात अडकले होते. यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांनी तात्काळ यंत्रणा बोलवून अडकलेल्या 3 लोकांना रेस्क्यू केले. हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी शहरातील रेल्वे उड्डाण परिसरातील केमिस्ट भवनातही शिरले असून त्याचबरोबर अनेक मॉलमध्ये पाणी शिरले आहे. मॉलमध्ये पाणी शिल्याने अनेक सामान आणि धान्य पावसाच्या पाण्यात भिजलं असून काही सामान पाण्यात वाहून गेल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
Published on: Sep 02, 2024 11:02 AM
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
