Maharashtra rain Update : पावसाचं पुन्हा कमबॅक, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं झोडपलं; वाहनं अर्धी पाण्यात अन् घरं…
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पवासाने कमबॅक घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्याला येल्लो अलर्ट दिला होता. या येल्लो अलर्ट नंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांना पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे.असाच पाऊस रात्रभर सुरू राहिला तर जिल्ह्यात पूर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले असून शहरातील रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी साचून वाहनं पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचे पाणी शहरातील रेल्वे उडान परिसरातील केमिस्ट भवनातही शिरले असून त्याचबरोबर अनेक मॉलमध्ये पाणी शिरले आहे. मॉलमध्ये पाणी शिल्याने अनेक सामान आणि धान्य पावसाच्या पाण्यात भिजलं असून काही सामान पाण्यात वाहून गेल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
Latest Videos
Latest News