जळगावात ढगफुटीसदृश पाऊस, रस्त्याची नदी, शेत-शिवार पाण्याखाली तर स्मशानातही शिरलं पाणी
जळगाव जिल्ह्यातील निमखेड, एनगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे नागरिकांची चांगलीच दैणा झाली. मुसळधार झालेल्या पावसामुळे शेत-शिवारात पाणी साचले असून नदी नाले देखील दुथडी भरून वाहू लागले आहे. बघा कसा झाला पाऊस?
राज्यातील विविध जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना दिसतोय. या मुसळधार पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढले आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील निमखेड, एनगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे नागरिकांची चांगलीच दैणा झाली. मुसळधार झालेल्या पावसामुळे शेत-शिवारात पाणी साचले असून नदी नाले देखील दुथडी भरून वाहू लागले आहे. जळगाव जिल्ह्यातली बोदवड तालुक्यात मंगळवारी पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता. या पावसाने तालुक्यातील वरखेड, एनगाव, निमखेड या परिसरात जोरदार ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर गावाबाहेर असलेल्या स्मशानातही पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. एनगाव, वरखेड निमखेड या शिवारात असलेल्या अनेक शेतात पाणी साचल्याने बळीराजा चिंतेत आहे.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?

