Solapur MNS Leader Murder : माझे पप्पा मला परत आणून द्या… मनसे पदाधिकाऱ्याच्या क्रूर हत्येनंतर लेकीची आर्त हाक अन् अमित ठाकरे भावूक
सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची बिनविरोधाच्या वादातून क्रूर हत्या झाली आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरला असून, सरवदे यांच्या लहान मुलीच्या आर्त हाकेने अमित ठाकरे भावुक झाले. भाजपने निवडणुका कोणत्या पातळीवर नेल्या आहेत, हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात यावे, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे. या प्रकरणी भाजप उमेदवारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सोलापूरमध्ये बिनविरोधाच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सोलापुरात मोठा आक्रोश व्यक्त होत आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, निवडणुका कोणत्या पातळीवर पोहोचल्या आहेत हे पाहण्यासाठी त्यांनी आपला प्रचार सोडून एक दिवस सोलापुरात यावे, असे आवाहन केले आहे.
सरवदे यांच्या लहान मुलीने केलेल्या भावनिक आवाहनामुळे अमित ठाकरे भावुक झाले. ही घटना सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 2 क वॉर्डात घडली. भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि अपक्ष उमेदवार रेखा सरवदे यांच्यातील वादातून हा प्रकार घडला. रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर मिरचीपूड टाकून कोयता, चाकू आणि गुप्तीने वार करण्यात आले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भाजप उमेदवारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. महाविकास आघाडीनेही या हत्येचा निषेध करत भाजपच्या राजकारणावर निशाणा साधला आहे.
नांदेडमध्ये शिंदे गटात खळबळ; आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भव्य प्रचार रॅली, तुफान गर्दी अन्...
छ. शिवाजी महाराजही पाटीदार.... भाजप मंत्र्याच्या विधानानं राजकीय वादंग
काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचारानं नागपूरमध्ये तुफान चर्चा

