Maharashtra Board 12th Result 2025 : ऑल द बेस्ट पोरांनो…. बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर...
इयत्ता 12 वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज सोमवार 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. यामुळे 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच धाकधूक वाढली असून काहीसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी 6 मे ते 20 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यातील साधारण 15 लाख विद्यार्थ्यांनी यंदा इयत्ता 12 वीची परीक्षा दिली होती. यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर या एकूण 9 विभागीय मंडळांचे निकाल एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. आज जाहीर होणाऱ्या या निकालावर विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरणार आहे. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, वाणिज्य आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत आहेत.
येथे पहा 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल…
2) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
2) https://results.digilocker.gov.in
असा तपासा तुमचा निकाल
वरील कोणत्याही एका बेवसाईटवर क्लिक करा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुमचा सीट क्रमांकासोबत आईचे टाकून ‘सबमिट’ करा.
तुम्हाला लगेच तुमचा निकाल दिसेल. या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
Published on: May 05, 2025 08:46 AM
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
