जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. एकूण 2.09 कोटी मतदार 25,482 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक खर्चाची मर्यादा आणि राखीव जागांचा तपशीलही घोषित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे विस्तृत वेळापत्रक घोषित केले आहे. या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे, तर मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
या निवडणुकीसाठी एकूण 2.09 कोटी मतदार असून, यामध्ये 1.07 कोटी पुरुष, 1.02 कोटी स्त्री मतदार आणि 473 इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण 25,482 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. 12 जिल्हा परिषदांमध्ये 731 सदस्य आणि 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 सदस्य निवडले जातील. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 16 जानेवारी 2026 पासून सुरू होईल.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित

