‘त्यांची’ वज्रमुठ तडा गेलेली, आमची विकासाची; फडणवीस यांनी मविआला छेडले
सध्या महाविकास आघाडीची अवस्था ही काही चांगली नाही. त्यांचा तीन तोंड ही वेगवेगळ्या दिशेला असतात. तीन भोंगे वेगवेगळ्या टायमाला वाजतात. एक सकाळी 9 ला वाजतो. दुसरा दुपारी 12 ला आणि तिसरा सायंकाळी. पण त्यांच्या बोलण्यात एकमत नसल्याचेच समोर आल्याचे फडणवीस म्हणाले
वाशिम : महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राज्यात मोठ बांधत सभांचा धडाका लवाला आहे. तर आपल्या सभांना मविआने वज्रमुठ सभा अशी टॅगलाईन दिली आहे. त्यावरून भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआला छेडले आहे. त्यांनी, मविआच्या वज्रमुठ छायाचित्र बघितले असून त्याला भेगा पडलेल्या आहेत. ही भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही असे रिसोड येथे भाजपा संकल्प सभेत म्हटलं आहे. तर सध्या महाविकास आघाडीची अवस्था ही काही चांगली नाही. त्यांची तीन तोंड ही वेगवेगळ्या दिशेला असतात. तीन भोंगे वेगवेगळ्या टायमाला वाजतात. एक सकाळी 9 ला वाजतो. दुसरा दुपारी 12 ला आणि तिसरा सायंकाळी. पण त्यांच्या बोलण्यात एकमत नसल्याचेच समोर आल्याचे फडणवीस म्हणाले. तर आमची वज्रमूठ ही विकासाची असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी

