पवारांच्या अदानींबाबत वेगळ्या भूमिकेवर शिवसेनेचं स्पष्टीकरण…
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मविआचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी मविआचे संबंध बिघडणार नाहीत असे म्हटलं आहे
मुंबई : राज्याच्या राजकारण सध्या महाविकास आघडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मित्रपक्ष एकत्र आहेत. मात्र सध्या याच मविआमध्ये राष्ट्रीय पातळीवर एकमत नसल्याचे समोर येत आहे. मग तो ईव्हीएम मशीन असो, वीर सावरकर असो किंवा आताचा उद्योगपती गौतम अदानी प्रकरण. आताही याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना ही अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशीची मागणी करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मविआचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
यावर खासदार संजय राऊत यांनी मविआचे संबंध बिघडणार नाहीत असे म्हटलं आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची स्वतंत्र भूमिका होती. पण विरोधकांची आघाडी तेव्हाही होती आणि आताही आहे. पवारांनी अदानींबाबत वेगळी भूमिका घेतली असेल, त्यांनी वेगळं मत मांडलं असेल तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार नाही, तडे जाणार नाहीत. पवारांनी अदानींनी क्लीन चिट दिलेली नाही तर चौकशीचे पर्याय त्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. आम्ही जेपीसीचा आग्रह धरतोय.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?

