AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे, 15 मिनिटांत झाला मोठा गेम!

ठाकरेंच्या सेनेला दुसरा मोठा दणका! आणखी एका नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे, 15 मिनिटांत झाला मोठा गेम!

| Updated on: Jun 04, 2026 | 3:29 PM
Share

राज्यात सगळीकडे विधान परिषदेचीच चर्चा सुरू आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये जलद घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत.

राज्यात सगळीकडे विधान परिषदेचीच चर्चा सुरू आहे. यावेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होत असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगला आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये जलद घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. ठाणेपाठोपाठ आता कोकणातही महायुतीला निवडणूक बिनविरोध करण्यात यश आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नुकतीच बाळ माने यांनी एका मतदारसंघातून माघार घेतली आणि आता ठाकरेंच्या सेनेतील धनंजय डिकोळेंनीही माघार घेतल्याचं चित्र आहे. धनंजय डिकोळे यांनी माघार घेतल्याने ठकरे गटाला मोठा फटका मानला जात आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटे शिल्लक असतानाच मोठया घडामोडी घडल्या.

एकूणच महायुतीला आता विधान परिषदेच्या पाच जागा बिनविरोध करण्यात मोठं यश आलं आहे. ठाणे, कोकण, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ अशा जागा बिनविरोध झाल्या आहेत. कोकणातील जागा बिनविरोध करण्यात नितीश राणे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. याशिवाय बाळ माने यांना ठाकरे त्यांच्या गटातून बरखास्त करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.

Published on: Jun 04, 2026 03:26 PM

Follow Us