मोठी राजकीय अपडेट! मुंबई पालिकेसाठी भाजप मनसेसोबत युती करणार? फॉर्म्युलाही ठरला?

भाजपसमोर यंदा मुंबई पालिकेत 100 हून जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं आव्हान असणार आहे. मनसेसोबत खरंत आता भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरते की बाहेरुन समर्थन घेऊन वेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 23, 2022 | 4:30 PM

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऐन तोंडावर आल्या आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत नेहमी शिवसेनेसोबत युती करणार का, यावर भाजप काय निर्णय घेतं, याची चर्चा असायची. मात्र यंदा भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा भाजप आणि मनसे मुंबईतील पालिका निवडणुकीच एकत्र लढणार असल्याचं बोललं जातंय. दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचंही कळतंय. भाजपसमोर यंदा मुंबई पालिकेत 100 हून जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं आव्हान असणार आहे. मनसेसोबत खरंत आता भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरते की बाहेरुन समर्थन घेऊन वेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें