अजितदादा शब्दाचे पक्के ! ‘माळेगाव साखर कारखान्याकडून उसाला राज्यात उच्चांकी दर, प्रतिटन किती रूपये जाहीर?
VIDEO | अजितदादांनी शब्द केला खरा; माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात सर्वाधिक ऊस दर देईल', राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द केवळ दोनच दिवसात केला खरा, सभासदांमधून काय व्यक्त होतेय भावना?
पुणे, ३१ ऑगस्ट २०२३ | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या नागरी सत्कारप्रसंगी माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात सर्वाधिक ऊस दर देईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर दोनच दिवसात माळेगाव कारखान्याने २०२२-२३ या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३४११ रुपये दर जाहीर केला आहे. त्यामुळं अजितदादा आपल्या शब्दाचे पक्के नेते असल्याची भावना सभासदांमधून व्यक्त होत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार हे नागरी सत्कार आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी बारामतीत होणाऱ्या विकासकामांचा आढावा घेत अनेक मुद्यांवर भाष्य केलं होतं.. तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना राज्यात सर्वाधिक दर देणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली होती. अजित पवार यांच्या नागरी सत्काराला दोन दिवस उलटल्यानंतर माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ऊस उत्पादक सभासदांना ३४११ रुपये प्रतिटन दर देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

