कणकवलीतील मल्हारी पूल कोसळला, 10 गावांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसामुळे कणकवलीत मल्हारी पूल कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला आहे.

कोकणात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्यात भयानक परिस्थिती आहे. या घडामोडी ताज्या असताना मुसळधार पावसामुळे कणकवलीत मल्हारी पूल कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाची भाजप आमदार नितेश राणेंनी पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणेंशी फोनवर संवाद साधला. या फोनद्वारे त्यांनी पुलाच्या बांधणीसाठी तातडीने उपाययोजन करण्याची मागणी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI