AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malshej Ghat Drone view : हिरवळ, दाट धुके अन् बेफाम कोसळणारा धबधबा... माळशेज घाटातील हे सौंदर्य तुम्हाला नक्कीच खुणावेल

Malshej Ghat Drone view : हिरवळ, दाट धुके अन् बेफाम कोसळणारा धबधबा… माळशेज घाटातील हे सौंदर्य तुम्हाला नक्कीच खुणावेल

| Updated on: Jul 11, 2024 | 4:17 PM
Share

माळशेजचा घाट आणि घाटातील धबधबे पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसतो. कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाल्याने अनेक हौशी पर्यटक आणि घाटातून प्रवास करणारे प्रवासी या फेसाळणाऱ्या धबधब्यांचा आंनद घेताय

पावसाळा सुरू झाला की अनेकांना वेध लागतात ते मान्सून सहलीचे… त्यातच काहींना पावसात चिंब भिजायचे असते तर काहीना फक्त निसर्गाच्या सौंदर्याला डोळे भरून पाहायचे असते. पावसाळा सुरू झाली की अवघ्या काही दिवसात निसर्गाने हिरवा शालू पांघरल्याचे पाहायला मिळते. अशातच माळशेजचा घाट आणि घाटातील धबधबे पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसतो. सध्या माळशेज घाटातील फेसाळणारे धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील धबधबे मोठ्या प्रमाणावर प्रवाहित झाल्याने अनेक हौशी पर्यटक आणि घाटातून प्रवास करणारे प्रवासी या फेसाळणाऱ्या धबधब्यांचा आंनद घेतांना दिसत आहेत. सुट्टीच्या दिवशी तर निसर्गाचा आंनद घेण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होत असते. यामुळे येथील स्थानिकांना पण मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने येथील दुकानदार पर्यटकांच्या सेवेसाठी आपली दुकाणे सज्ज ठेवतांना दिसत आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने काही धबधबे, पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी पर्यटकांना निर्बंध आणले आहेत.

Published on: Jul 11, 2024 04:17 PM