शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात केलं भयंकर कृत्य, कोल्हापुरात काय घडलं?
तुम्हाला महाभारतातील शकुनी मामा किंवा कंस मामा माहिती असेलच. पण कलियुगातील असा मामा कधी पाहिलाय का? कोल्हापुरातील एका मामाने असं काही कांड केलं आहे, ज्यामुळे हजारो लोकांचा जीव जाता-जाता राहिलाय.
आपल्या बालपणी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं आजोळ… अन् त्यातही आपला लाडका व्यक्ती म्हणजे मामा. मात्र शकुनी मामा आणि कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातील मामाच्या कृत्यानं तुम्ही देखील थक्क व्हाल. तुम्हाला महाभारतातील शकुनी मामा किंवा कंस मामा माहिती असेलच. पण कलियुगातील असा मामा कधी पाहिलाय का? कोल्हापुरातील एका मामाने असं काही कांड केलं आहे, ज्यामुळे हजारो लोकांचा जीव जाता-जाता राहिलाय. भाचीच्या लग्नात या मामानं असं भयंकर कृत्य केलं की भाचीच्या लग्नाचा खेळखंडोबाच व्हायचं बाकी राहिलंय. सुदैवाने या लग्नात मोठी दुर्घटना टळली आहे. भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथे ही घटना घडली. आपल्या मर्जी विरोधात भाचीने आठवड्यापूर्वी गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून मामाने हे कृत्य केलं. महेश जोतीराम पाटील असं या मामाचे नाव आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांकडून शोध सुरू आहे.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...

