Dadar Pigeon Feeding : कबुतरांना दाणे टाकयला दादरला आला अन्… थेट कोर्ट, सरकारला चॅलेंज देणं पडलं महागात, घडलं काय?
सरकार आणि कोर्टाला आव्हान देणाऱ्या व्यक्तीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या मनाईनंतर एका व्यक्तीनं गाडीवर टप बांधून कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रयत्न केला. तर स्थानिकांनी रोखल्यानंतर संबंधित व्यक्तीनं मुजोरपणाची भाषा करत सरकार आणि कोर्टाला काय अडचण आहे असा प्रश्न केला.
कबुतरांमुळे अनेकांना श्वसनाचे विकार होत असताना सुद्धा अनेक लोक ना सरकारच ऐकतायत आणि नाही त्यांना कोर्टाच्या आदेशाची काही परवा उरली आहे. महेंद्र संकलेचा या नावाच्या एका इसमांनं आपल्या गाडीवर एक टप ठेवून घेतला आणि त्यात ही व्यक्ती दाणे टाकून कबुतरांना जमवतोय. ही व्यक्ती राहते लालबागला मात्र गाडी घेऊन येते दादरच्या कबुतरखाण्याजवळ त्या व्यक्तिला स्थानिकांनी विचारल्यावर एक नाही तर अजून बारा गाड्या येत असल्याचं उद्धामपणे ही व्यक्ती उत्तर देते. स्थानिकांनी आरटीओ आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू असं म्हटल्यानंतर समोरून आपणच काल रात्री मुख्यमंत्र्यांना व्हिडीओ पाठवल्याचा दावा ही व्यक्ती करते. थोडक्यात आपलं कोणीही काहीही करू शकत नाहीये हा आविर्भाव या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
कबुतरांना दाणे टाकण्यात जैन समुदाय आग्रही आहे मात्र कबुतरांची विष्ठा आणि पंखांमधल्या निघणाऱ्या कणांमधून गंभीर आजार जडतात यावर कोर्टान कबुतरखाने हटवण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेने कारवाई केली पण जैन समुदायासह काही पक्षीप्रेमी आक्रमक झाल्यानंतर सरकारची ही भूमिका मवाळ झाली. मात्र आता कोर्टाच्या आदेशातल्या पळवाटा शोधत लोक कबुतरांसाठी दाणे टाकू लागलेत.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

