Manikrao Kokate : कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
Manikrao Kokate Controversial Statement : माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोकाटेंनी यापूर्वी देखील शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हंटलं आहे. राहुल गांधी, सुनील केदार यांच्यावर 24 तासात कारवाई केली आहे. मात्र कोकाटे लाडके मंत्री असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र माणिकराव कोकाटे यांच्या विधानाबद्दल अनभिज्ञ आहेत. कोकाटे काय बोलले माहिती नाहीत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, असं वादग्रस्त विधान कोकाटे यांनी केलं आहे. त्यावरून आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.
Published on: Apr 06, 2025 01:09 PM
Follow Us
Latest Videos
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

