Maratha Reservation Rally : ते 2-4 भंगार पोरं… CSMT स्थानकावर गोंधळ घालणाऱ्या तरूणांवर जरांगे भडकले, बघा काय म्हणाले?
सीएसएमटी स्थानकावरील मुलं कोणाच्या ओळखीचे आहे. सरकार आपल्याला सहकार्य करत आहे. मला उपोषणामुळे उद्यापासून बोलता येणार नाही. आता सरकार सहकार्य करत आहे. त्यामुळे आता मुंबई जी जाम झाली आहे ती मोकळी करणे गरजेचे आहे, असे आवाहनही जरांगे यांनी आंदोलकांना केले.
मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाजवळील सीएसएमटी स्थानकावर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर पाऊस पडत असल्याने हे सर्व मराठा आंदोलक स्टेशनवरच थांबलेत. यापैकी काही झोपल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही जरांगेंच्या नावाच्या घोषणा देत आहेत. यावेळी या आंदोलकांनी काहीसा गोंधळही घातल्याचे दिसून आले. हा सगळा प्रकार मनोज जरांगे पाटील यांना समजताच ते आक्रमक झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, मुंबईत मराठा आंदोलन चालू असताना कायदा व सुव्यस्था कायम राखली जावी यासाठी जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना मोठा आदेश दिला आहे. त्यांनी मराठा आंदोलकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले. यासह जरांगे असेही म्हणाले की, दोन चार भंगार पोरांमुळे सगळा गोंधळ स्टेशनवर होतोय. त्या भंगार पोरांना शांता राहा असे सांगायला सरपंच सीएसटीवर गेले होते. मात्र ते पोरं सरंपंचांनाच उलटे बोलायला लागले आहेत. म्हणजेच ते मुलं आपल्यातले नाहीत. कारण सरपंच महाराष्ट्रातील जवळपास सर्वच आंदोलकांना ओळखतात, असे सांगत असताना गोंधळ घालणारे आंदोलक तरूण कुठले ते तपासा, असे आदेशही दिले.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

