मनोज जरांगेंची पोलीस सुरक्षा काढा! थेट सहकाऱ्यानेच केला पोलिसात अर्ज
मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस सुरक्षा नको अशी भूमिका घेतली आहे. त्यांचा सहकारी किशोर मरकड यांनी जालना एसपी कार्यालयात अर्ज सादर केला. हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणाचा तपास थंडावल्याची जरांगे पाटील यांना शंका असल्याने त्यांनी सुरक्षा हटवण्याची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी किशोर मरकड यांनी जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात मनोज जरांगे पाटील यांची पोलीस सुरक्षा काढण्याबाबत अर्ज दिला आहे. जरांगे पाटील यांनी स्वतः आपली पोलीस सुरक्षा नको अशी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली होती. हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणाचा तपास थंडावला असल्याचा जरांगे पाटील यांना संशय आहे. त्यामुळे त्यांनी शासनावर टीका करत पोलीस सुरक्षेची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. माध्यमांसमोर त्यांनी आपली सुरक्षा हटवण्याची किंवा आपल्याला सुरक्षा नको असल्याची भूमिका मांडली होती. त्यानुसार, आज पोलीस अधीक्षकांना सुरक्षा हटवण्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
Published on: Nov 20, 2025 10:51 AM
Latest Videos
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?

