एकीकडे मागास म्हणता अन् आडनावापुढं पाटील लावतात, सुषमा अंधारे यांची जरांगे यांच्यावर सडकून टीका
राज्यभरात ठिक-ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी तब्बल १०० जेसीबीतून फुलांची आणि गुलालाचीही उधळण करण्यात आली. यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांचं राज्यभरात ठिक-ठिकाणी जंगी स्वागत केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी तब्बल १०० जेसीबीतून फुलांची आणि गुलालाचीही उधळण करण्यात आली. यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकीकडे मागास म्हणता तर दुसरीकडे आडनावापुढे पाटील लावतात, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला आहे. तर मागास म्हणवून १०० जेसीबीतून फुलांची उधळण करतात? असा खोचक सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे यांच्या टीकेवर आता मनोज जरांगे पाटील काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?

