येडपटाला सांगा आडवंतिडवं…बीडच्या सभेतून जरांगे पाटलांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना डिवचलं
मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असणार? मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे केली घोषणा... एकदा मुंबईत आल्यावर हा मराठ्यांचा समुदाय पुन्हा मागे फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. देव जरी आला तरी आरक्षण घेणार. मराठ्यांनो शांततेत चला.
बीड, २३ डिसेंबर २०२३ : येडपटाला म्हणा आता मध्ये बोलू नको. शांत राहा. नीट झोप. आडवंतिडवं बोलू नको. येडपटाला सांगा घरी गप्प बस, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांना पुन्हा डिवचल्याचं पाहायला मिळालं. तर एकदा मुंबईत आल्यावर हा मराठ्यांचा समुदाय पुन्हा मागे फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. देव जरी आला तरी आरक्षण घेणार. मराठ्यांनो शांततेत चला. तुमच्या आंदोलनाचा धूराळा जरी दिसला तरी सरकार म्हणेल येऊ नका तिथंच थांबा, असे म्हणत मनोज जरांगेंनी खोचक टोला लगावला. तर मुंबईत येताना ट्रॅक्टर आडवणाऱ्याला मारू नका. त्याला पकडा. ट्रॅक्टरमध्ये टाका. मुंबईला आंदोलनात आणा. त्याला खाऊ पिऊ घाला. बेसन द्या, भाकरी द्या. ट्रॅक्टर आमचं, डिझेल आमचं, ससेहोलपट आमची, आडवणारे तुम्ही कोण?, असा आक्रमक सवालही जरांगेंनी केला.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप

